” सर्पमित्रांनी पकडला भला मोठा अजगर साप, वन्यप्रेमींनी केली मदत “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील बोरगाव डोये येथे एका शेतकऱ्याच्या शेतात शेतमजुर धान कापणीचे काम करीत असताना भला मोठा अजगर साप दिसला. त्यामुळे शेतकरी सह शेतात काम करणारे शेतमजूर त्या अजगर सापाला पाहुन घाबरले त्यामुळे शेतमजुरामधे भीतीचे वातावरण निर्माण झाले असता सर्पमित्रांना यांची माहिती देण्यात आली.या घटनेची माहिती मिळताच वन्यप्रेमी व सर्पमित्र यांनी तात्काळ दखल घेऊन अजगर सापाला पकडून ताब्यात घेतले.
अशावेळी सर्पमित्र लोकांच्या व शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत असतात. सर्पमित्र शुभम रासेकर, सोहेल शेख, अभिषेक चंदनखेडे ,वन्यप्रेमी समीर बल्की, मंगेश बल्की पोलीस पाटील,शेतमजुर उपस्थित होते. फॉरेस्ट विभाग शंकरपूर, येथे नोंद करून जंगलात सोडण्यात येणार आहे. असे सांगितले व अजगर सापाला जीवनदान देण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून
सर्वत्र अभिनंदन होत आहे.