प्रचाराची पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- भाजप महायुतीचे उमेदवार आ.बंटी भांगडिया यांनी सांगितले की मला चिंता राजकारणाची नसून आपला विश्वास आणि आशीर्वाद टिकवून ठेवण्याचा आहे.आपली साथ प्रामाणिक पणाची आहे.आपल्यावर कोणीही टीका करीत असेल तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मविवा ची अडीच वर्ष सत्ता असताना त्यांनी काय केले असा सवाल करीत शेतकरी, बोनस वर विस्तृत माहिती देत खडसंगी च्या विकास आणि प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचे सांगत येत्या २० नोव्हेंबर ला कमळ चिन्हावर बटन दाबून मला मतदान रुपी आशीर्वाद देण्याची विनंती केली.
लाडली बहीण २१०० रू व शेतकरी राजाचा सातबारा कर्ज मुक्त करून देण्याचा वचन दिले.मंचावर भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे,जेष्ठ नेते मजहर शेख, मधुकरराव बनसोड,कमल असावा, बियांनी अंकल, रोशन बनसोड, नाना मेश्राम आदी मंचावर उपस्थित होते.भाजप महायुतीचे उमेदवार आ. बंटी भांगडिया यांनी समाजातील घटकाना न्याय देण्याचे काम करीत त्यांनी अपंग, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात व कोरोना काळात मदतीची साथ दिली असल्याचे सांगत निराधारांचे आधार म्हणजे आमदार बंटीभाऊ भांगडिया असल्याचे माजी पस सदस्य अझहर शेख व्यक्त केले.
भाजप महायुतीचे उमेदवार आ. बंटी भांगडिया यांची खडसंगी येथे प्रचार पदयात्रा मध्ये ठीक ठिकाणी महिलांनी औक्षवंत करीत त्यांना निवडून येण्यासाठी आशीर्वाद देत रॅली वाद्य गजरात महादेव मंदिर जवळ कॉर्नर सभेत रूपांतर झाले.कॉर्नर सभेचे संचालन माजी पस सदस्य अजहर शेख यांनी केले.या पदयात्रा रॅलीत भाजप जेष्ठ नेते मजहर शेख, युवा नेते समीर राचलवार,माजी पस सदस्य अजहर शेख, महेशजी काबरा, भाजयुमो तालुका महामंत्री रोशन बनसोड अमित जुमडे, सचिन मेश्राम,मनी रॉय, रवी कोलते, श्रेयस लाखे, प्रमोद श्रीरामे,आदित्य कारेकर, नितीन दोडके सौ प्रियंका दागमवार, समीना शेख, सौ सुषमा पिंपळकर, सौ वैशाली चंन्ने सह शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.