जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – गुप्त माहितीच्या आधारे दिनांक. २६/११/२०२४ ला रात्री ०१:०० वाजता खडसंगी येथील एफ.डी. सी. एम. वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र.२६ मधील जंगल परिसरातील रस्त्याने अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना वनपरिक्षेत्र अधिकारी खडसंगी येथिल ए.के. सोनुरकर, जि. आय. उईके वनपाल, कु.एस. हि. खोब्रागडे वनरक्षक, यादव गोटे वनमजूर, पातुरकर वनमजूर तसेच वाहन चालक संजय वाळके यांनी दोन ट्रॅक्टरला पकडून खडसंगी येथिल कार्यालयात जप्त केले.
प्रथम ट्रॅक्टर वाहनचालक – अनिकेत विनोद रणदिवे असून ट्रॅक्टर मालक – सुभाष राजेराम रणदिवे आहे. तसेच दुसरा ट्रॅक्टर वाहन चालक – रूपेश अशोक कुमरे असून ट्रॅक्टर मालक – ज्ञानेश्वर मारोती मेश्राम यांचे आहे.प्राथमिक गुन्हा रिपोर्ट नोंद करण्यात आली आहे. पुढील उचीत कारवाई करीता विभागीय व्यवस्थापक, चंद्रपूर वन प्रकल्प विभाग चंद्रपुर चे विभागीय व्यवस्थापक एस. वाय मरसकोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
चिमूर शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे महसूल प्रशासन याकडे लक्ष देतील का अशी चर्चा नागरिक करतांना दिसत आहे.