Breaking News

रेती चोरांच्या मुसक्या आवरीत ट्रॅक्टर केला जप्त

रेती तस्करी करिता वापरल्या जातो बिना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक 28-11-2024 रोजी शंकरपुर उपवनक्षेत्राअंतर्गत नियतक्षेत्र डोमा मधील संरक्षित वन कक्ष क्रमांक 478 मध्ये अवैध्यरित्या रेती उत्खनन व वाहतुक प्रकरणात वनाधिकाऱ्यांनी रेती भरून असलेला ट्रॅक्टर व ट्रॉली केली जप्त.

घटनेची सविस्तर माहिती अशी की डोमा नियतक्षेत्रात वनाधिकाऱ्यांनी गस्ती दरम्यान ट्रॅक्टरचा जंगलात आवाज असल्याने त्या भागात गेले असता तिथे काही इसम ट्रैक्टर ट्रॉलीमध्ये फावडे व टोपल्याच्या सहाय्याने रेती भरतांना दिसले. त्यानंतर घटनास्थळी वनाधिकारी जात असतांना त्या इसमांना वनाधिकाऱ्यांची चाहुल लागताच सैरावैरा जंगलाच्या दिशेन पळत सुटले वनाधिका-यांनी आवाज दिला असता कोणीही त्या ठिकाणी थांबले नाही.

जवळ जावून पाहणी केली असता त्याठिकाणी अर्धवट रेती भरलेले लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रॉली दिसून आले. ते सुद्धा बिना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली यामध्ये 40 घनफुट रेतीसह चार फावडे व चार घमेले आढळून आले. रेती भरलेले लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर चेचीस क्रमांक MBNSFALBEJNL 02250 व ट्रॉलीचा चेचीस क्रमांक AL201210565 असा आढळून आला व वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेवून जप्तीनामा, पंचनामा करुन वनगुन्हा क्रमांक 09149/228709/2024 दिनांक 28/11/2024 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33(1) (बी), 41 व 42(1) नुसार गुन्हा नोंद करुन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चार प्लॉस्टिकचे टोपले, चार लोखंडी फावडे वनपरिक्षेत्र कार्यालय चिमूर येथे जमा केले.

प्रकरणाचा तपास किशोर देऊरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) चिमूर यांचे मार्गदर्शनात संतोष औतकर, वनपरिमंडळ अधिकारी शंकरपुर हे करीत असून कार्यवाही दरम्यान रामदास नैताम, वनपाल (गस्त पथक) चिमूर, विशाल सोनुने वनरक्षक, कालीदास गायकवाड वनरक्षक, पोटे वनरक्षक (गस्त पचक) प्रदिप ढोणे, दिवाकर डांगे वनमजूर हे हजर होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

बनावट दारूच्या विरोधात सतत च्या मालिकेनंतर एक्साईज डिपार्टमेंट ची शेवगांव शहरातील अनेक परमिट रूमवर धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने …

चोपडा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ मासीक मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- दिनांक 16/05/2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved