चिमूर आगार व्यवस्थापक यांना उपसरपंच अशोक चौधरी यांचे निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- सद्या थंडीचे दिवस सुरू असून विद्यार्थ्यांना शाळा वेळेवर मिळावी यासाठी एसटी बसची वाट बघत असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी शंकरपुर ग्रामपंचायत चे उपसरपंच यांनी चिमूर आगार व्यवस्थापकास दिले निवेदन.
सविस्तर माहिती अशी वरोरा, चिमूर, शंकरपूर, कान्पा, नागभीड, ब्रम्हपुरी या मार्गासाठी एकही बस सुरु नसून दररोज व्यापारी वर्ग तसेच शाळेकरी विध्यार्थी नागभीड, ब्रम्हपुरी व वरोरा येथे महाविद्यालय आय.टी.आय व नर्सिंग करिता दररोज ग्रामीण खेडे विभागातील शेकडो विद्यार्थी व कर्मचारी वर्ग शाळेसाठी, कार्यालयीन कामाकरिता दवाखान्याकरिता व इतर कामाकरिता दररोज त्यांना ब्रम्हपुरी किंवा वरोरा ला जाणाऱ्या प्रवाश्यांना नाहक त्रास होत असून या मार्गे एकही बस नसून या मार्गे जाण्यासाठी कान्या वरून ब्रम्हपुरी ला जावे लागतो व चिमूर वरून वरोराला जावे लागतो.
त्यामुळे आपण वरोरा, चिमूर, शंकरपूर, कान्पा, नागभीड, ब्रम्हपुरी व ब्रम्हपुरी, नागभीड, कान्पा, शंकरपूर, चिमूर, बरोरा मार्गे जाणारी चिमूर आगार ची एस.टी. बस सेवा सुरु करण्यात यावी यापूर्वी चिमूर, ब्रम्हपुरी व वरोरा या आगाराच्या बस फेऱ्या नियमित सुरु होत्या गेल्या काही वर्षापासून बंद असलेल्या बस फेऱ्या पुर्वत सुरु करण्यात यावे. या निवेदनाची प्रतीलिपी चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसान यांना देण्यात आली.