तंबाखू व गुटखा विक्रेत्यामध्ये उडाली खडबड
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर धाडी टाकून कारवाई केली. त्यामुळे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले.
सदर कारवाई मध्ये 1,35,780 रुपये किमतीचा इगल सुगंधित तंबाखू एकूण 438 नग प्रत्येकी 200 ग्रॅम, 33,620 रुपये किमतीचा होला हुक्का शिशा तंबाखू (प्रत्येकी 200 ग्रॅम वजनाचे 41 पॉकेट) एकूण 205 नग पाऊच, 3,360 रुपये किमतीचा हुक्का शिशा तंबाखू (प्रत्येकी 40 ग्रॅम वजनाचे 07 पॉकेट) एकूण 84 नग, किं. 21,120/- रु. इगल हुक्का शिशा तंबाखू (प्रत्येकी 400 ग्रॅम वजनाचे 33 पॉकेट) 330 पाऊच असा एकूण 1,93,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशन भिसी येथे अपराध क्र. 219/24 कलम 223, 274, 275 भान्यासं सहकलम 30(2), 26(2)(अ), 3, 4, 59 (1) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे गुन्हा नोंद केला… गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पो. स्टे. भिसी येथील मुद्देमाल मोहरर कडे जमा केले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे स. फौ. धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, पोहवा नीतीन कुरेकार, अजय बागेसर, पोकॉ प्रशांत नागोसे, शशांक बदामवार, चापोहवा दिनेश अराडे यांनी केली आहे