महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्याकडे मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत टेमुर्डा परिसरात बेकायदेशीरपणे सुरेश टिकाराम अहिरकर रा. नांदगाव ता. मुल यांचे देशी दारूचे तथा इतर वाईन शॉपी चे दुकान कुख्यात दारू तस्कर अंजु अन्ना यांच्या माध्यमातून स्थानंतरण केल्या जात असल्याने या परिसरातील गरीब तरुण युवकांना नशेच्या आहारी जाण्याची भीती असल्यामुळे सामाजिक आरोग्य यामुळे धोक्यात आल्याने टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाचे स्थानंतरण करू नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व टेमुर्डा परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरोरा तालुक्याच्या खांबाडा येथील कुख्यात दारू तस्कर अंजु अन्ना यांच्यावर दारूबंदी दरम्यान व त्या अगोदर दारू तस्करीचे अनेक गुन्हे विविध पोलीस स्टेशनं मध्ये दाखल असतांना त्यांना खांबाडा येथे आकाश नामक बिअर बार ची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून बेकायदेशीर मंजुरी देण्यात आली होती, त्या खांबाडा येथील बिअर बार मधून दारूबंदी असलेल्या हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात विदेशी दारूचा पुरवठा अंजु अन्ना यांचे लोकं करतात त्यामुळे या परिसरात बिअर बार सोबतच देशी दारूचे दुकान टेमुर्डा येथे सुरु करण्यासाठी त्यांनी सुरेश टिकाराम अहिरकर रा. नांदगाव ता. मुल यांचे देशी दारूचे दुकान स्थानंतरण करण्यासाठी टेमुर्डा ग्रामपंचायत ला अर्ज दिला होता, त्या अर्जाच्या अनुषंगाने महिलांची ग्रामसभा दिनांक १८/०७/२०२४ रोजी ग्राम पंचायत टेमुर्डा येथील सभागृहात आयोजित केली होती.
सदर महिला सभेच्या अध्यक्ष म्हणून सुचिता प्रवीण ठाकरे सरपंच ग्रामपंचायत टेमुर्डा यांची उपस्थिती होती. सदर सभेला उपस्थित महिलांनी देशी दारू सुरु करण्याचे बाजूने १०२ मते तर सुरु न करण्याचे बाजूने १२१ महिलांचे मतदान झाले, यावरून टेमुर्डा ग्रामपंचायत परिसरात देशी दारूचे दुकान सुरु करण्यासाठी महिला सभेतून विरोध करण्यात आला होता आणि देशी दारू सुरु कारण्याबाबत महिलांच्या महत्वपूर्ण सभेतून इथे देशी दारू दुकान सुरु करण्यात येऊ नये असे स्पष्ट संकेत आहे, मात्र तरीही या परिसरात देशी दारूचे दुकान सुरु करण्याच्या हालचाली अंजु अन्ना यांच्या माध्यमातून सुरु असून त्यासाठी त्यांनी टेमुर्डा येथे जागा घेऊन बांधकाम सुरु केले आहे.
टेमुर्डा गाव ही जवळपास 30 ते 35 गावाची बाजारापेठ असून या ठिकाणी जर देशी दारूचे दुकानाला मंजुरी मिळाली तर कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो आणि कुख्यात दारू तस्कर अंजु अन्ना यांची या देशी दारू दुकानाच्या माध्यमातून हिंगणघाट समुद्रपूर या दारूबंदी तालुक्यात दारूचा पुरवठा होऊ शकतो सोबतच टेमुर्डा खांबाडा या परिसरातील गावागावात देशी दारू पुरवठा होऊन विद्यार्थी तरुण युवक यांना दारूचे वेसण लागू शकते आणि त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते, अगोदरचं राज्य उत्पादन शुल्क विभागाने चुकीच्या पद्धतीने अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारूचे दुकान बिअर बार मंजूर करून मोठा भ्रष्टाचार केला असल्याची उदाहरणे समोर असतांना आता टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाला मंजुरी देणे.
म्हणजे इथेही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुख्यात दारू तस्कर अंजु अन्ना यांच्याकडून लाखों रुपये घेतले असल्याची स्थिती दिसत आहे, त्यामुळे या गंभीर प्रकरणी चौकशी करून देशी दारू दुकानाचे स्थानंतरण होऊ देऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपल्या प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे, यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळबांधे, मोहित हिवरकर, किशोर धोटे, धनराजव बाटबरवे, महाराष्ट्र सैनिक व असंख्य नागरिक उपस्थित होते.