” वडाळा पैकु येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पाठलाग करून पकडला ट्रॅक्टर “
” चिमूर तहसील कार्यालय येथे ट्रॅक्टर जप्त “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खुलेआम अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असून दिनांक. १६/०१/२०२५ ला सावरगाव नेरी मार्गावर रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना सुद्धा माफियांची माफियागिरी बंद न होता सर्रास दैनंदिन अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरूच असल्यामुळे तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी गोपनीय मोहिम सुरू केली.
असून आज दिनांक. १७/०१/२०२५ रोजी रेती भरून असलेला वीना नंबरचा स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर मुंडा क्रमांक.एम एच ३४ बी जी ११८६ वीणा नंबरची ट्रॉली सह वाहतूक करीत असतांना चिमूरचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वडाळा पैकु येथे सकाळी ०७:३० वाजताच्या सुमारास पकडून कारवाई करण्यात आली.
सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव मनोज नागपुरे असे असून ट्रॅक्टर चालकाचे नाव विक्की दिनकर नन्नावरे राहणार नेरी असे आहे.या घटनेमुळे रेती माफियांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दैनंदिन अशाप्रकारे मोहिम राबविण्यात येणार असल्याने आता जनतेची रात्रीची फाटक्या सायलेंसरच्या कर्कश आवाजाने उडणारी झोप उडणार नसल्याने हे जनतेमध्ये चर्चेचे विषय ठरले आहे.