घटनास्थळी बघ्यांची मोठया प्रमाणावर गर्दी – चालक घटनास्थळावरून पसार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यातील सावरगाव नेरी मार्गावर पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर सावरगाव येथे रेती खाली करून परत रेती भरायला नेरी मार्गाने जात असतांना चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर शेतात पलटी मारला व त्यात एका मजूरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
चिमूर पोलिसांना याबाबत ची माहिती मिळताच क्षणी घटनास्थळी दाखल झाले. परंतु मृतकाच्या परिवाराने जोपर्यंत ट्रॅक्टर मालक घटनास्थळी येणार नाही तोपर्यंत मृतकाचे शव शव विच्छेदन करू देणार नाही अशी मागणी परिवाराने रेटून धरली त्यामुळे घटनास्थळी बघ्याची मोठया प्रमाणावर गर्दी जमायला सुरुवात झाली.व दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास वाहणाचे मालक घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलीस आणि वाहन मालक तसेच मृतकाच्या परिवाराशी आपसी तळजोळ करून शव विच्छेदन करायला नेण्यासाठी पोलीसांना परवानगी दिली. शव विच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.
हि घटना पहिलीच नसून अशाप्रकारच्या घटना चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घडलेल्या असल्याने यावर पोलीस प्रशासन तथा महसूल अधिकारी यांचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये बघावयास मिळाली. तर ज्या वाहणाने अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जाते ते वाहन परिवहन विभागाकडे नोंदणीकृत नसल्याचेही सर्रास चित्र दिसून येत आहे.वाहनाच्या ट्रॉली तसेच मुंड्यावर नंबर नाहीत अशाही अवस्थेत अवैध वाहतूक केली जात असल्याच्या अनेक आव्हानात्मक घटना समोर येत आहे.