Breaking News

AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स दुधारी तलवार -अॅड. चैतन्य भंडारी

जितके फायदे तितकेच धोकेही जास्त

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई :- आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल अनेकांना माहित झालेलं आहेच. जे काम मेंदूही सक्षमपणे करू शकत नाही ते काम हे नवे तंत्रज्ञान करून देतेय. आधी तर आपल्याला लोकेशन मॅपवाल्या बाईचे कौतुक वाट्याचे की कसे काय ती बरोबर आपल्याला योग्य लोकेशनवर नेते. ते नंतर सवयीचे झाले आणि नंतर अलेक्साबाईचे आगमन झाले, एखाद्या पीए सारखी ती तुमची कामे करू लागली. तेही दांड्या न मारता आणि बिनचूक लोक एकदम खुश झाले आणि त्यानंतर या सर्वावर वरताण करणारे आले हे “एआय” याची मोहिनी अनेकांना पडलीय ते स्वाभाविक आहे कारण या तंत्रज्ञानात काय नाही ते विचारा. त्यामुळे अगदी उच्च विद्याभूषित देखील याकडे वळले. अर्थात चांगल्या अर्थाने आणि चांगल्या विचाराने वापरलं गेलं तर “एआय” हे नक्कीच वरदान ठरू शकेल असं वाटत असतानाच त्याचे दुसरे रूपही वेगाने समोर येतेय. जे अतिशय भयानक आहे.या “एआय” मध्ये नेमकं होत काय? तर तुमच्या मनात जे काही असेल त्याचा तपशील “एआय” प्रणाली मध्ये फीड केला अन कमांड दिली की अवघ्या काही सेकंदात तुम्हाला जे हवं ते तुम्हाला “एआय” हजर करत. म्हणजे समजा अमिताभच्या चेहऱ्याला धर्मेंद्रचा लाव असं सांगितलं तर आधीच्या काळी फोटोशॉप मध्ये ते काम केलं जायच मात्र ते तितकं फिनिश्ड नसल्याने लगेच लोकांना ओळखू यायच. पण आता “एआय” फोटो एडिटिंग आणि क्रियेटिंग मध्ये इतकं प्रचंड विकसित झाले आहे की तुम्हाला मूळ चित्र कोणतं आणि डुप्लिकेट हे कितीही झूम करून पाहिले तरी कळणार नाही इतकं फिनिश्ड लेव्हलचे काम यात होतेय. अशी इतरही विविध कामे करतोय. एआय भविष्यात आणखी काय काय घेऊन येणार आहे याची कल्पनाही करवत नाही. त्यातून कोणीही सुटू शकणार नाही.तर असे हे “एआय”चे फक्त एक टक्का रूप. सुरुवातीलाच मी म्हटलं तस की हे “एआय” म्हणजे दुधारी तलवार आहे. योग्य व्यक्तीच्या हाती पडली पराक्रम घडवून इतिहास रचू शकतील पण वाईट हाती पडली तर नरकयातना आणि विध्वंस नक्की. तुम्ही म्हणाल की मग आता काय करायच ? सगळं बंद करून रानावनात पुन्हा गुहेत जाऊन राहून कंदमुळं खात जगायच का. तेच बाकी शिल्लक आहे. तर मंडळी, असेहीं काही नाही. मी नेहमी सांगतो तसे पूर्वी लोक पायी प्रवास करायची अथवा बैलगाडीने.त्याकाळात ऍक्सिडेंटचे प्रमाण अगदीच नगण्य होते, म्हणजे जणू नव्हतेच. पण आता वेगवान कार्स आल्या, त्यामुळे ऍक्सीडेन्ट वाढले पण म्हणून आपण प्रवास करणे / गाडी चालवणे बंद नाही केले. तर आता अधिक सावधगिरीने चालवतो. अगदी तसेच “एआय” बद्दल आणि एकूणच सोशल मीडियाबद्दल वागायचे आहे. हा सोशल मीडिया आहे त्यामुळे खाजगी जीवन इथं आणू नका.

सोशल मीडियावर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे विशेषत महिलांचे फोटो पोस्ट करणे शक्यतो टाळा. कारण त्याचा मिसयुज “एआय” च्या मदतीने होऊन नंतर पुढं ब्लॅकमेल बदनामी असं चक्र सुरु होऊ शकते. तसेच अजून एक म्हणजे सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही फोटो व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नका.अन घाईत रिऍक्ट होऊन फॉरवर्ड करत बसू नका.थोडा वेळ थांबा.गुगलवर अथवा इतर सोर्सवर नीट त्याबद्दल शोधा.तेव्हा आपोआपच कळेल की ते सत्य आहे की फेक. तेव्हा सावध राहा मंडळी सजग राहा. जर आपल्यासोबत अशा प्रकारचे काही गुन्हे घडले असतील तर आपण तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व डॉ. धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – …

पायदळ चालुन पकडले अवैध रेती वाहतुकीचे तीन ट्रॅक्टर

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर तहसील कार्यालय येथे रात्रीला ट्रॅक्टर जप्त जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved