jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
“शहरातुन निघाली भव्यदिव्य शोभायात्रा“
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- रामनवमी हा मुख्यतः एक हिंदू सण आहे जो भगवान रामाची जयंती साजरी करतो. हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला (हिंदू कॅलेंडर) पाळला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हा दिवस सामान्यतः मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या दरम्यान येतो. यावर्षी 2025 मध्ये रामनवमी 6 एप्रिल रविवारी असल्याने चिमूर शहर भगव्या पताक्याने सजवण्यात आले होते. आणि चिमूर सहित संपूर्ण तालुका राम नामाच्या गजरात भक्तीमय झाले होते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर शहरात रामनवमी उत्सव समिती मार्फत व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्ती कुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या उपस्थितीत चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराजांचे आशिर्वादाने श्रीराम च्या जय घोषात व नाचत गाजत पोलिसांच्या बंदोबस्तात शांतता पुर्ण भगव्या अशा वातावरणात संपन्न झाले. सायंकाळी पाच वाजता महाआरती करून प्रभू श्रीराम यांच्या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. ढोल. ताशा. लेझिम पथक. शोभायात्रेचे मुख्य आकर्षण होते. यावेळी संपूर्ण चिमूर वासी रामनवमी उत्सव बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.