Breaking News

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २१ हजार ७५३ प्रवाशांचे आगमन

आणखी ३० विमानांनी येणार प्रवासी

मुंबई दि. २६ – ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १४१ विमानांनी २१ हजार ७५३ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत आणखी ३० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत आलेल्या एकूण २१ हजार ७५३ प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ७९२१ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ७५७२ आहे.

या देशांतून आले नागरिक

आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हॉगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, रोम, जर्मनी, दुबई,  मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्यूयॉर्क या देशातून प्रवासी मुंबईत आले आहेत.बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सूचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता अहमद पटेल का निधन

नई दिल्ली :- कांग्रेस के वरिष्ठ नेता अहमद पटेल का निधन हो गया है। उनके …

असम के पूर्व मुख्यमंत्री तरुण गोगोई का निधन

गुवाहाटी :- असम के पूर्व मुख्यमंत्री तरुण गोगोई का 86 वर्ष की आयु में आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved