
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हात काल राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे धाड टाकून 1 लक्ष 24 हजार 800 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अवैध दारूसाठा केला जप्त.
दारु तस्तरीच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक नेहमीच गस्तीवर असते. माञ भरारी पथकाला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी पहाटे चार वाजता महाकाली मंदिर सुपर मार्केट वॉर्ड चंद्रपूर येथील राजेश दरबारसिंग ठाकुर यांच्या घरी धाड टाकली. यावेळी त्यांचेकडून 1 लक्ष 24 हजार 800 रुपये किंमतीच्या रॉकेट देशी दारू 90 मिली क्षमतेच्या एकूण 48 बॉक्स जप्त करण्यात आले.
राजेश दरबार सिंग ठाकूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ई) अन्वये कारवाई करून अटक करण्यात आली आहे. यासंबधात पुढील तपास सुरू आहे. वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुरचे अधिक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपूर, गडचिरोली विभागाचे प्रभारी निरीक्षक अमित क्षिरसागर तसेच विभागाचे पोलीस शिपाई चेतन अवचट, सुदर्शन राखुंडे व जगन पुट्टलवार यांनी सदर कार्यवाही पार पाडली.