
मुंबई: “महाराष्ट्रात उद्यापासून मंदिरं आणि सर्व प्रार्थनास्थळं उघडण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केले असून त्यांनी काही सूचना केल्या. तसेच ही श्रींची ही इच्छा असल्याचंही ते म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून देशात जे वातावरण होतं त्यामध्ये मंदिरंही बंद करावी लागली. पण देवाचे आशीर्वाद महाराष्ट्रावर होते, त्यामुळे आपण ते संकट परतवून लावू शकलो. पण, अजूनही ते पूर्ण संपलेलं नाही. त्यामुळे ज्या सूचना सरकारने केल्या त्याचे काटोकोरपणे पालन करा, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील जनतेला केलं.
देशभरात मोदींच्या आदेशानुसारच मंदिरं आणि प्रार्थनास्थळं बंद होती. जर हे ते भाजप विसरले असतील. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना त्यांची शाळा घ्यावी लागेल. आमच्यासाठी राम मंदिर उभारणे म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.