Breaking News

27 ते 31 ऑगस्ट दरम्यान गोरेवाडा पर्यटकांसाठी बंद

प्रतिनिधी नागपूर

नागपूर दि. 26 : 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटकांसाठी बंद राहील. प्रकल्पातील वाघ, बिबट, अस्वल व तृणभक्षी वन्यप्राण्यांचे सफारी क्षेत्रामध्ये रानतुळस व गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पर्यटकांना वन्यप्राणी दृष्टिस पडत नसल्यामुळे पर्यटकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.याबाबत त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यानुसार इंडियन सफारीमधील सफारी क्षेत्रातील वाघ, बिबट, अस्वल व तृणभक्षी वन्यप्राण्यांचे एन्क्लोझरमध्ये गवत व रानतुळस काढण्याचे काम पूर्ण करण्यासाठी गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटकांसाठी बंद राहील, असे पी. बी. पंचभाई विभागीय व्यवस्थापक गोरेवाडा प्रकल्प यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वरोरा येथे शिवसैनिकांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक …

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनी केला गुणवंतांचा सत्कार

पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जागतिक पर्यावरण दीन व पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved