Breaking News

चिमूर तालुक्यातील प्रिन्ट व डिजीटल मिडीया एकाच बॅनर खाली

चिमूर क्रांती प्रेस क्लब ची स्थापना
महीला पत्रकारांसह पन्नास पत्रकांरांचा ” जम्बो ” संघटन

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातिल गोर गरीब अन्यायग्रस्त जनतेच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्येशाने चिमूर तालुक्यातील प्रिन्ट मिडीया व डिजीटल मिडीया च्या पत्रकारांनी एकत्र येवून ” चिमूर क्रांती प्रेस क्लब ” चि स्थापना केली.
विशेष बाब म्हणजे चिमूर तालुक्यातील महिला पत्रकारांसह प्रिन्ट व डिजीटल मिडीयाचे जवळपास पन्नास पत्रकार एकाच बॅनरखाली एकत्र आले असून जिल्ह्यातिल एकमेव “जम्बो” संघटना चिमूरात निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
दिनांक १ सप्टेंबर रोज बुधवार ला चिमूर येथील शासकीय विश्राम गृहात जेष्ट पत्रकार रामदास हेमके यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ट पत्रकार पंकज मिश्रा यांच्या मार्गदर्शनात तालूक्यातील प्रिन्ट व डीजीटल मिडीया च्या पत्रकारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये चिमूर क्रांती प्रेस क्लबची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदावर चिमूर चे लोकमत समाचार प्रतीनीधी विनोद शर्मा यांची तर सचीव पदावर डिजीटल मिडीया चे जावेद पठान यांची एकमताने निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदावर CTV चे चिमर प्रतीनिधी श्रीहरी सातपुते तर उपध्यक्ष पदावर प्रिन्ट मिडीया चे भिसी चे राजेन्द्र जाधव( सकाळ ), शंकरपुर चे युवराज मुरस्कर ( सकाळ ),नेरी चे योगेश सहारे( पुन्यनगरी ) तसेच डिजीटल मिडीया ची महीला पत्रकार समीधा भैसा रे नेरी यांची नियुक्ती करण्यात आली.
सहसचीव पदावर खडसंगी चे प्रमोद राऊत ( पुन्यनगरी ),नेरी चे संजय नागदेवते ( महासागर) व डिजीटल मिडीया चे विलास मोहीनकर, चिमूर यांची निवड करण्यात आली. तसेच सुनिल हिंगणकर ज्वाला समाचार चिमूर,आशीष गजभिये खडसंगी,शुभम बारसगड़े नेरी,सुनील कोसे नेरी,पंकज रणदिवे नेरी,प्रवीण वाघे चिमूर,रोशन जुमडे, चिमूर,गणेश येरमे कोलारा, जगदीश पेंदाम शंकरपुर, कल्याणी मुनघाटे यांना सदस्य पदावर घेण्यात आले. तसेच जेष्ठ पत्रकार लोकमत चे चिमूर प्रतीनिधी रामदास हेमके व भिसी येथील नवभारत चे पत्रकार पंकज मिश्रा हे संघटनेचे मार्गदर्शक राहतील.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved