
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील लखमापूर छत्तीसगढ़ी मोहल्ल्यातील रुकधन किराणा दुकानचे – मालक रुकधन परसराम साहु या व्यक्तीने आपल्या राहत्या घरी देशी बनावटीची अग्निशस्त्र बेकायदेशीर लपवुन ठेवल्याची माहिती गोपनीय सुत्रांकडून प्राप्त झाली, माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेल्या माहितीनुसार, तत्काळ रवाना झाले व रुकधन किराणा दुकान येथे पोहोचून त्याचे दुकानात मालक रुकधन परसराम साहु वय 52 वर्ष रा. लखमापूर वार्ड क्रमांक 3 चे छत्तीसगढ झोपडपट्टी, चंद्रपूर यांचे घराची झडती घेतली असता त्यांचे घरझडतेमध्ये एक देशी बनावटीचे लाँग बॅरल पिस्टल व पाच जिवंत काडतुसे मिळाली
त्याची अंदाजे किंमत 10,000/- दहा हजार रुपये असल्याचे सांगितले आहे, मिळालेली देशी पिस्तल पांचा जिवंत काडतुसे जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक 865/21कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगर करीत आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अरविन्द साळवे, मा. अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.पो.नि. बोकडे, पो.उप. नि. संदीप कापडे, संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, कुंदन बवरी यांनी केली पुढिल तपास सुरू आहे.