
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत मिंडाळा येथील एकाच परिवारातील आई , मुलगा व मुलीला जादूटोणा प्रकरणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. फिर्यादीच्या तक्रारी वरून पाच आरोपीस अटक केली आहे. जिवती तालुक्यात वनी खू्र्द येथील अंधश्रद्धेची घटना ताजी असताना नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे दि. ३१ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ते ४ वाजताच्या दरम्यान अशोक कामटे रा. मिंडाळा हा व्यक्ती जादुटोना करतोय या कारनाने आरोपी प्रमोद सडकामे , सिताराम सडकामे, मयूरी सडकामे, पिल्ला आत्राम, रा. मिंडाळा आणि मयूरी ची आई कान्पा, यानी यशोदा कामटे यांना हाताबूक्यानी मारहाण केली तसेच अशोक कामटे याला नागभीड दुचाकीवरून मिंडाळा येथे जबरदस्तीने नेऊन नीलेश सडकामे याच्या घरासमोरील असलेल्या पाण्याची टाकीचे लोखंडी रॉडला दोरीने बांधून त्याला बॅटने व काडीने अशोभनीय मारहाण करून जखमी केला या प्रकरणी काल दि. १सप्टेंबर रोजी अशोक ची आई व बहिण पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरूद्ध नागभीड पोलीसात तक्रार दाखल केली. लगेच पोलीस ताफा घटनास्थळ गाठून प्राथमिक तपास करून आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध अप क्रं ३३०/२९२१ कलम १४३,१४७ , १४८ , १४९,१५२,३२४ , ३४२,३६३,३६८,३२३,गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपीच्या मारापोठी अशोक कामटे हा फार घाबरलेला असून तो कुठे तरी लपला आहे. त्यामुळे त्याचा शोध सर्वत्र घेणे सुरू आहे सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे, घटनास्थळास पोलीस अधीक्षक अरविंद सावळे चंद्रपूर, मिलिंद शिंदे एसडीपीओ ब्रम्हपुरी यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला आहे पुढिल तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.