Breaking News

राष्ट्रीय पोषण महिन्यात मातांच्या लसीकरणावर भर द्यावा-जिल्हाधिकारी

प्रतिनिधी नागपूर

नागपूर दि. 27 : सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या महिन्यात पोषणाशी संबंधित उपक्रमासोबत साजरा करण्यात येणार आहे.या दरम्यान यानुसार 0 ते 13 वर्ष वयोगटातील मुलाच्या मातांना प्राधान्याने कोविड लस देण्यावर भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज दिले .
छत्रपती सभागृहात पोषण महिन्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र भुयार. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण ईश्वर लखोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर. शिक्षणाधिकारी काटोलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व इतर तसेच क्षेत्रीय कार्यालयातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.
सही पोषण देश रोशन या संकल्पनेवर विविध उपक्रम राबविण्यात येतील. मानवी जीवनात पोषणाचे अन्यन्यसाधारण महत्व आहे. पोषणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी जरी हा महिना साजरा करण्यात येत असला तरी कोविड लसीकरणावर भर द्यावा. कोरानेाच्या काळात सुपोषणाची गरज अधोरेखीत झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या महिन्यात राज्यभरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामध्ये विविध उपक्रमासह जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर प्रकल्पस्तरावर व जिल्हास्तरावर राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या महिन्यामध्ये ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केल्या जातील व त्याच्या नोदी दररोज जन आंदोलन dash बोर्ड पोर्टल डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट पोषणअभियान डॉट जीओव्ही डॉट इनवर घेण्यात येतात. अंगणवाडी सेविका, मदतनीस, एएनएम, आशा वर्कर व गावातील प्रतिष्ठीत नागरीकाद्वारे रॅली काढली जाईल. व सामाजिक जनजागृती केल्या जाईल. यामध्ये वृक्षारोपण करणे. वाटिका तयार करणे. परसबाग लावणे, गर्भवती माता व मुलांसाठी पोषण आहार संबधी, सुदृढ बालक स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पोषण वाटिका स्पर्धा घेतल्या जातील.
कोविड -19 लसीकरणाबाबत जनजागृती करणे. माझे “मुल माझी जबाबदारी”. त्यासाठी आरोग्य खात्याबाबत शिबीर आयोजित केल्या जाईल. त्यासाठी ॲनिमिया मुक्त भारत च्या अनुषगाने, गरोदर माता, किशोरी मुली, यासाठी रक्त तपासनी, उपचार आणि समुपदेशन, पाककला स्पर्धा व अति कुपोषित बालके ओळखून त्यांना आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा देणे. औषधाउपचार, आहार तज्ज्ञ आहारांचे मार्गदर्शन केले जाईल. सुपोषित भारत घडवून आणण्यासाठी समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग अतिआवश्यक आहे. 2018 पासून दरवर्षी सप्टेंबर महिना “राष्टीय पोषण महिना” म्हणून सपूर्ण देशभरात साजरा करण्यात येत असतो. राष्टीय पोषण महिन्यामध्ये सर्व विभागामध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागाची भूमिका महत्वाची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर यांनी सांगितले.
पोषण महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाची नोंद जनआंदोलन डाटा एन्ट्री पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या कार्यक्रमाच्या नोंदी पुढील डाटा एन्ट्री एचटीटीपीएस कोलन हॅश पोशन अभियान डॉट जीओव्ही डॉट इन/हॅश/लॉगिन या लिंकवर करण्यात याव्यात, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर लखोटे यांनी सांगितले.
पोषण महिना राबवित असतांना कोविड -19 च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व प्रतिबंधात्मक पालन करणे बंधनकारक राहील. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोषण महिन्याचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा शेवगाव वकील संघाची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव :- दि. 13 जुलै 2024 वार शनिवार (प्रतिनिधी) शेवगाव पोलीस …

फोर व्हीलर गाडी घुसली शेतात – चालकासह दोघे जण जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नागभीड वरून चिमूर कडे येत असतांना शिरपूर नेरी मार्गावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved