Breaking News

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा-जिल्हा प्रशासनाचे आवाहन

प्रतिनिधी नागपूर

नागपूर दि.6 कोरोनाच्या संसर्ग वाढीला गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी कारणीभुत ठरू नये. यासाठी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हयातही मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
गणेशोत्सव साजरा करतांना सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे सुसंगत व मर्यादित मंडप उभारावे .सार्वजनिक मंडळाची सजावट साधी असावी. सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती 4 फूट तर घरगुती गणपती 2 फुटांचा असावा. शक्यतो घरातील धातु/ संगमरवर या मुर्तीचे पुजन करावे.शाडूची किंवा पर्यावरणपुरक मुर्ती असल्यास घरी विसर्जन करावे. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे .घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणपती आणतांना वा विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही.
नागरिक देतील ती देणगी मंडळांनी स्वीकारावी. मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम शिबीरे, रक्तदान यांच्या आयोजनावर भर द्यावा. आरती, भजन, किर्तन करतांना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
गणेश मंडळानी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी. राज्यातली कोरोना विषाणूची संसर्गाची परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने गणेशोत्सवासाठीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्यावर्षीही कोरोनाच्या जागतिक साथीमुळे राज्यामध्ये गणेशोत्सवासाठीच्या विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. विसर्जना आधीची आरती घरीच करून, मग मूर्ती थेट विसर्जनासाठी आणावी. एकाच इमारतीतल्या अनेक घरगुती गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.
कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनवर्सन ,आरोग्य व पर्यावरण ,वैदयकीय शिक्षण्‍ तसेच संबं‍धित महानगरपालीका ,नगरपालीका , पोलीस ,स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करण्यात यावे.तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसीध्द झाल्यास त्याचेही अनुपालन करणे बंधनकारक राहील ,असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी जगदीश कातकर यांनी कळवले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved