Breaking News

खडसंगी प्रा.आ.केंद्रात डोळे तपासणी व चष्मे वितरण कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :-चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील प्रा.आ.केंद्रात दि.९-९-२१ रोजी डोळे तपासणी शिबिर व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर यांचे सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य केंद्रा अंतर्गत गावातील स्त्री, पुरुषांची डोळ्यांची तपासणी अवंती आँप्टीकल व चमु द्वारे करण्यात आली आणी ४५२ लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले.

या शिबीराचे उद्घाटन जि.प.सदस्य तथा जि.प.उपाध्यक्ष व रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष कोरेकार मँडम यांचे हस्ते पार पडले तसेच पुंडलिक मत्ते पं. स.सदस्य हे प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते.मान्यवरांनी शिबीराचा ऊद्देश याविषयी मनोगत व्यक्त करुन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले शिबिरा प्रसंगी डॉ. श्रीकांत रणदिवे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रास्ताविक केले.

संचालन विजय सोनुने आरोग्य सहायक यांनी केले.
या शिबीराचे यशस्वीतेसाठी डॉ. धारणे मँडम वैद्यकीय अधिकारी,नागोसे नेत्र चिकित्सक, व आरोग्य केंद्रतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved