
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर : – मुंबई येथील साकीनाका अत्याचार पिडीत महिलेची मृत्यूशी झुंज लढत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच अमरावती जिल्हयातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या अल्पवयीन व ७ महिण्याच्या गर्भवती मुलीला बदनामीच्या भितीने स्वतःला गळफास लावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यागत घटना घडली असून आणखी पुन्हा धक्कादायक घटना समोर आली आहे,
उल्हास नगर रेल्वे स्थानकाजवळ १४ वर्षीय मुलीला एका पडक्या खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्या मुलीला वाचविण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केला. परंतु त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिल्या गेली असून या सर्व प्रकारावर आळा घालता आला नाही म्हणून अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ दिसून न येता यावर कुठेतरी आढा घालण्यात आला असे दिसेल.
आणि अशा घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय असतांना या प्रकरणाची सिद्धता झाल्यास लगेच अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला हवी जेणेकरून महिलांना कुठेतरी न्याय मिळेल व महिला समाजासमोर उंच भरारी घेऊन मान उंच करून जगतील व स्वतंत्र भारतात अशा प्रकारच्या घटना समोर घडणार नाही. आरोपींना कुठेतरी अशा प्रकारे वागल्यास फाशीची शिक्षा होईल असा भास होताच अशा कृत्यास चालना देऊ नये कुठेतरी महिलांचा आदर करावा असं जाणवेल याची जाणीव लक्षात घेऊन महिला मुक्ती मोर्चा चिमूर तालुक्याच्या वतीने उप विभागीय कार्यालय चिमूर येथे उपविभागीय अधिकारी संकपाळ तसेच चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष नाजेमा पठाण, तालुका सहकारी अध्यक्ष योगेश रामटेके,तालुका सचिव कल्पना बहादुरे,तालुका कोषाध्यक्ष उज्वला खोब्रागडे, तालुका महासचिव आशिष सांगोले,तालुका संघटक शहेनाज अंसारी,तालुका सहसचिव आकाश श्रीरामे, चिमूर शहर अध्यक्ष विलास मोहिनकर, चिमूर शहर उपाध्यक्ष सुनिल हिंगणकर व आदींची उपस्थिती होते.