
“विद्यापीठाच्या संरक्षण विषयक अभ्यासक्रमाच्या केंद्राचे उदघाटन”
नागपूर दि. 14 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नागपूर जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते नागपूर विद्यापीठाच्या संरक्षण विषयक अभ्यासक्रम केंद्राचे बुधवारी उद्घाटन करणार आहेत.
बुधवार 15 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथून सकाळी 10.20 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.25 वाजता विमानतळ येथून वाहनाने राजभवन कडे प्रयाण.
सकाळी 10.50 वाजता राजभवन येथे आगमन व वेळ राखीव. दुपारी 3.45 वाजता राजभवन येथून 4.00 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे आगमन. त्यानंतर संरक्षण विषयक अभ्यासक्रमाच्या केंद्राचे त्यांच्या हस्ते उदघाटन होईल.सायंकाळी 5.00 वाजता विद्यापीठातून राजभवनकडे प्रयाण व तेथे मुक्काम. गुरूवार सकाळी 11 वा. विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.