
नियमांचा भंग करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केली लूट
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
गोंदिया : – शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारी ‘किसान युवा क्रांती संघटना गोंदिया’ ही नेहमीच तत्पर असते. अशाच एका महत्वाच्या प्रकरणात संघटनेने १४ सप्टेंबर २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे. संघटनेच्या पत्रात वर्ष २०१४ पासून २०२० पर्यंत कार्यरत सोसायटींवर कार्यवाहीनूसार धान घेण्याचा अधिकार नसल्याचा उल्लेख आहे.
तरीसुद्धा नियमांचा भंग करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली. तसेच शेतकऱ्यांचे बारदाना खरेदी केंद्र पदाधिकाऱ्यांनी वापर करून परतही केला नाही तसेच त्याचे पैसे सुद्धा दिले नाहीत. तरी नियमांचा भंग करून केलेल्या सर्व खरेदी विक्री प्रकरण, त्यात सामील धान सोसायटी तसेच
सोसायटी पदाधिकारी, असे जिल्ह्यातील सर्वच दोषींवर कारवाही व्हावी,
असे ‘किसान युवा क्रांती संघटना गोंदिया’ चे म्हणणे संघटनेचे संस्थापक यशवन्त गोसावी व जिल्हा अध्यक्ष लोकचंद बिसेन यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी गोंदिया यांना कळविले आहे. तसेच योग्य वेळेत योग्य कार्यवाही न झाल्यास ‘जिल्हा मार्केटिंग’ विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.