
-उसेगाव वासीय स्थानिकांमध्ये दैनंदिन चर्चा सत्र सुरू-
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील अनेक पुरस्कार प्राप्त उसेगांव ग्राम पंचायत कार्यालयाला ८ सप्टेंबर ला १० वाजुन ४५ मिनिटांनी कुलुप ठोकले.सवीस्तर वृत्त असे असे होते की , उसेगांव ग्राम पंचायतचे शिपाई भाष्कर शेन्डे यांना ग्राम पंचायत कार्यालयाच्या चाब्या संरपंचाचे पती शिगाल पाटील , उपसरपंच निखील चाफले व ब्रम्हा सांदेकर ग्रा.प.सदस्य यांनी जबरदस्तीने हिसकावून ग्राम पंचायतला ८ सप्टेंबर २०२१ ला १०:४५ वाजता कूलुप ठोकले.
ग्राम पंचायत कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा अधीकार यांना कुणी दिला असा ? निर्माण झाला शिपायाकडून जबरदस्तीने चाब्या कशा काय घेतल्या ? घरचा कुलुप कशाला लावले ? ग्रामपंचायतचे काही महत्वाचे दस्तावेज गहाळ झाले असतील तर यास कोण जवाबदार राहील ? असे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते.
जर ग्रामसेवकांची बदली करायची आहे तर कूलुप ठोकणाऱ्यांनी कलेक्टर व जील्हा परीषद यांच्याकडे कागदोपत्री प्रक्रिया करायला पाहीजे पण शासकीय कार्यालयाला कुलुप लावणे हे कितपत योग्य ? या कुलुप ठोकणाऱ्याची तक्रार पोलीस स्टेशन चिमूर येथे करण्यात आली.
तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती चिमूर येथे सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली असून सुद्धा अजूनही आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.अशी दबक्या आवाजात उसेगांव वासीयात चर्चा सुरू आहे.