
शिवसेना महिला आघाडीने दिले तात्काळ चौकशी करीता निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शहरातील वडाळा पैकु येते दोन दिवसाआड़ नळाला पाणी येत होत असून नळाला संपुर्ण वडाळा पैकु परीसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथिचे रोग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, डेंगू सारखे पॉजिटिव रुग्ण सुधा वाढत आहे, गेल्या 6 ते 7 महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टाकी साफ केली नाही, संपूर्ण प्रकरणाकड़े नगरपरिषदचे दुर्लक्ष होत आहे,
याबाबत प्रकणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांचेवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी सर्व वडाळा पैकु वासीयांच्या माध्यामातून शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे मार्गदर्शनात शिवसेना चिमूर तालुका महिला आघाडीच्या वितिने चिमूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी भोयर याना निवेदन देण्यात आले,
यावेळी महिला आघाडी तालुका प्रमुख माधुरी केमये, संगीता कुमरे, सारिका केमये, माधुरी शिरभये, वनिता आडकिने, पुष्पा शिरभैये, वंदना आड़किने, वनिता रोकड़े, मंगला चौधरी, नंदा सावसाकड़े, सुशीला जाम्भूले, शहर प्रमुख अनंता गिरी, संतोष कामडी, विभाग प्रमुख आशीष बगुलकार, उपशहर प्रमुख सुभाष नन्नावरे, प्रसिद्धि प्रमुख सुनिल हिंगणकर उपस्थित होते