जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील वडसी गावचे सुपुत्र प्रसिद्ध कवी साहित्यिक व विचारवंत ॲड. भुपेश पाटील यांच्या गाव पेटुन उठतो तेव्हां या काव्यसंग्रहाचे प्रथम प्रकाशन चिमुर येथे झालेल्या आंबेडकरी साहित्य सम्मेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस व अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचे हस्ते झाले होते.
मात्र या कवितासंग्रहाला वाचकाचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याने या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली. दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृह सिताबर्डी येथे संपन्न झाला.
काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व विचारवंत ॲड फिरदोस मिर्झा यांचे हस्ते पार पडले अध्यक्षस्थानी प्रा दिपक खोब्रागडे होते तर या काव्यसंग्रहाची समीक्षा करण्यासाठी समिक्षक म्हणून प्रा. यशवंत खडसे डा. मनोहर नाईक डा. सुरेश खोब्रागडे डा. केशव मेंढे प्रसिध्द कवी लोकनाथ यशवंत ई. उपस्थित होते सुत्रसंचालन डा. रवींद्र तिरपुडे यानीं केले तर आभार प्रदर्शन सुरेश डांगे यानीं केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठि भानुदास पोपटे नेरी हरि मेश्राम चिमूर ई नी मोलाचे सहकार्य केले…