Breaking News

चिमूर पोलिसांनी केली मोहाफुल दारू हातभट्टीवर मोठी कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक 3/11/21रोजी दुपारच्या सुमारास 11:00 ते 1:00 वाजेच्या दरम्यान चिमूर पोलिसांना अवैध मोहाफुल दारू हातभट्टीवर कारवाई करुन मोहिम राबविण्यात आली, गुप्त खात्रीशीर बतमीदाराच्या माहितीनुसार माणुसमारी जंगल परिसरात रेड केली असता सदर ठिकाणी अवैधरित्या मोहाफुल दारूची हातभट्टी मिळून आली हातभट्टी चालक आरोपी हा पोलिसांना दुरूनच पाहून जंगलाच्या दिशेनी पळून गेला त्याची ओळख पटविली असता त्याचे नाव शुभम शंभरकर रा.कवडशी ता.चिमूर असे पोलीस सुत्रांकडून समजले.

पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि मंगेश मोहोड, पो हवा विलास निमगडे,पो शि कृनाल राठोड, पो शि शैलेश मडावी यांनी कारवाई करीत 6 नग प्लास्टिक ड्रम प्रत्यकी 50 किलो असा एकूण 300 किलो मोहा सडवा कि 60000/रु,

3 प्लास्टिक कॅन मध्ये प्रत्यकी 10 लि.प्रमाणे एकूण 30 लि.मोहा दारु कि.9000 /रु,3 लोखंडी ड्रम की.1500/रु, 2 जर्मनी वाटे कि.1000/रु, 6 नगर प्लास्टिक ड्रम कि.1200/रु
असा एकूण 72700/रु.चा माल जप्त करण्यात आला असून फरार आरोपी शुभम शंभरकर रा. कवडशी ता. चिमूर याचे विरुद्ध पो स्टे ला
अप क्र 473/21 कलम 65(फ,ब,क) म दा का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved