
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील नेरी व खुंटाळा येथे चंद्रपुर एल.सी.बी. च्या पथकांनी दिनांक 5/11/2021 रोजी दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास मोहीम राबऊन पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत नेरी चौकी येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि सचिन गदादे कर्मचारी चालेकर, मुळे,नागोसे अराडे तसेच पोलिस स्टेशन चिमूर चे सपोनी मंगेश मोहोड, कर्मचारी निमगडे, मडावी यांनी संयुक्त कारवाई करुण रमेश गंगाधर बानकर रा. नेरी याचे घरी धाड टाकली.
असता त्याचे घरातून प्रतिबंधीत सुंगंधित तंबाखू रू.74,600/- चा जप्त करण्यात आला. तसेच खुटाळा येथील पंढरी किसन सुरकर याचे दुकानात धाड टाकुण रू. 40,000/- सुगंधीत प्रतीबंधक तंबाखू मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असुण पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला.
चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुगधींत तंबाखुची विक्री होत असते .करोडो रूपयाचा तंबाखु व्यापाऱ्याकडुन विकल्याजात असतो. या अगोदर सुध्दा सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात आली होती. अनेक व्यापाऱ्याकडे लाखो रूपयाचा ईगल , चारमीनार , मजा , अन्य सुगंधीत तंबाखू साठा असल्याचेही नागरिकात बोलल्या जात आहे.
तसेच नेरी येथे मोठे तंबाखुचे रँकेट असुन याचे नेरी हे सुगंधित तंबाखूचे माहेरघर म्हणून समान्य नागरिकात ओळख आहे. मात्र या बाबीकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आजच्या करवाईवरून सामन्यांना वाटत आहे.
मात्र अनके दिवसांच्या प्रतिक्षेनंतर उशिरा का होईना धडक कारवाई केल्याने अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत . सदरची कारवाई अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सा, सहा.पोलीस अधिक्षक नोपानी सा , पो.नि. बाळासाहेब खाडे स्थागुशा, पो.नि. मनोज गभने पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.