नागपूर, दि.५: येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. प्रकाश महादेवराव बेलोरकर ( वय ८२) यांचे काल( ता. ४) अल्पशा आजाराने निधन झाले.
पशुवैद्यकीय क्षेत्रात प्रा. बेलोरकर हे एक नामांकित व्यक्तिमत्त्व होते. कृत्रिम रेतन पद्धतीसंदर्भातील एक तज्ज्ञ म्हणून त्यांची विशेष ओळख होती. या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा जेष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एक अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी गुजरातमधील आनंद येथून डॉक्टरेट संपादन केली होती. त्यांच्यामागे कन्या दीपाली, मुले पराग, तुषार आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. वर्धा आणि ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी तसेच राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव विवेक भिमनवार यांचे ते सासरे होत.