Breaking News

जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात बांधले युवकांनी शिवबंधन

चक तिरवंजा (कवठी) येथील युवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्करजी जाधव साहेब , जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतजी कदम साहेब व विधानसभा संपर्क प्रमुख रितेशजी रहाटे साहेब यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या जनसंपर्क अभियानात शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

या जनसंपर्क अभियानाला ग्रामीण भागात उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या जनसंपर्क अभियानामुळे शिवसेनेत अनेकांची इन्कमिंग सुरू आली आहे.ग्रामीण भागातील असंख्य युवक शिवसेनेच्या कार्याला प्रेरित होऊन व जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश घेत आहे. भद्रावती तालुक्यातील चक तीरवंजा (कवठी ) येथील जनसंपर्क अभियानादरम्यान गावातील असंख्य युवक व पुरुषांनी जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या नेतृत्वात व सरपंच शंकरभाऊ भोगेकर, विधानसभा संघटक सुधाकरभाऊ मिलमिले, सचिनभाऊ बोढाले, प्रकाशभाऊ कुरेकार, व गोविंदभाऊ बदकी यांच्या सहकार्याने शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी समस्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved