Breaking News

शेअर मार्केटमध्ये पैसे घेणाराणे केले विष प्राशन त्याच्याकडे गुंतवणूक केलेले गुंतवणूक करणारे सलाईनवर ???

जिल्हा प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील काही खेड्या पाड्यातील गावांमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो असे सांगून पंधरा ते सतरा टक्के व्याज देतो अशी बतावणी करून फसवणूक करणारे कोट्यावधी रुपये घेऊन झाले पसार एकाने देणेकरांच्या धाकाने केले विष प्राशन शेवगाव शहरात एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार मात्र त्याच्याकडे गुंतवणूक केलेले शेकडो सर्वसामान्य नागरिक सलाईनवर आहेत सध्या शेवगाव शहरासह तालुक्यात या प्रकारचा नवीनच व्यवसाय सुरू झाल्याने आपल्याला दोन पैसे जादा मिळतील या अमिषाला बळी पडून “जे कधी कोणाच्या करंगळीवर मुतत नाहीत” अशी हौशे नवशे आणि गवशे घरातील सोनं नाणं गहाण टाकून वावर विकून कामधंदा सोडून आपल्याकडील हजारो लाखो रुपये या “गाजराच्या पुंगीत ” गुंतवतात “शेअर मार्केट चले तो चांद नाही तो रात तक” या व्यक्तीप्रमाणे सुरू असतो

*ताजा कलम*

*सुरुवातीला या व्यवसायामध्ये हजारो लाखो रुपये गुंतवलेले लोकांकडे मुद्दलीपेक्षा कितीतरी फोटो रक्कम जास्त आल्याने या व्यवसायाची समर्थन करणाऱ्यांची एक मोठी कोळी निर्माण झालेली आहे आम्हाला दोन रुपये मिळतात तुमच्या पोटात काय दुखते मी एक लाख गुंतवले होते मला दहा लाख रुपये मिळाले तुमच्या पोटात का गोळा येतो असे काही लोक त्यांची जाहिरात करतात परंतु जगात जी गोष्ट मोजता येते { वेळ किंवा पैसा } ती एक दिवस संपते नष्ट होते*

*विशेष बाब*

*सध्या फोरेक्स मार्केट फार फेमस झाले आहे सकाळी नऊ ते रात्री तीन ते चार वाजेपर्यंत काही नमुने मोबाईल हातात घेऊन ऑनलाइन मार्केटिंग करत असतात मटका लागणारा जसा एक दिवस आकडा लागला की साऱ्या गावाला बोंबलून सांगतो मला इतक्या हजारो मिळाले परंतु त्या पाई घरातील भांडीकुंडी विकलेचे सांगत नाही असा प्रकार सुरू तर नाही ना*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved