शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची भामटी पोरगी गेली पुण्याला तिसऱ्या सोबत पळून
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील मूळ रहिवासी असलेली तरुणी आधी मुळच्या बोधेगावच्या रहिवाशी असलेल्या ठाण्याच्या तरुणाशी केलं लग्न { त्याच सोन्याच दुकान लुटून केला पोबारा } लग्नाच्या त्या नवऱ्या पासून झाली एक मुलगी त्या नंतर देवटाकळीच्या तरुणाला प्रेमाचं खोटं नाटक करून घातला वीस लाख रुपयांना गंडा आणि आता पुण्याला पळून जाऊन एका तरुणाचे आयुष्य करतीय बरबाद याबाबत शेवगाव पोलिसांमध्ये आणि पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाने केली तक्रार या तरुणीचे लग्न तिच्या आई-बाबांनी { खोटी माहिती सांगुन } फसवून या तरुणाशी रीतसर आळंदी येथे लावून दिले लग्नानंतर त्या मुलीचे भामटे आई-वडिल आणि ढालगज मुलगी यांनी मिळुन नवरदेव मुलाच्या दिव्यांग आईला आणि नवरदेवाला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले अर्धा एकर वावर मुलीच्या नावावर कर नाहीतर तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन देवटाकळी शिवारातील वावर स्वतःच्या नावे त्या भामट्या मुलीने करून घेतले त्यावर आलेल्या उसाच्या पिकाचे लाखभर रिपयांचे पेमेंट सुद्धा स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले अंगावरील पाच तोळे सोनं उसाचे पेमेंट एक लाख रुपये व बारा लाख रुपये किमतीची जमीन असा एकूण वीस लाख रुपयांना गंडा घालून ही तरुणी लग्नानंतर दोनच महिन्यात फरार झाली.
या फसवणूक झालेल्या तरुणांने तिच्या माहेरी खरडगावला येथे अधिक सखोल चौकशी केली असता मूळचा बोधेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाशी तिचे पंधरा वर्षे पूर्वीच लग्न झाले होते आणि तिला एक तेरा वर्षांची मुलगी सुद्धा त्या नवऱ्या पासून झाली आहे देवटाकळीच्या तरुणाशी लग्न झाल्यानंतर ही मुलगी माझ्या भावाची आहे.
अशी खोटी बतावणी करून ती मुलगी स्वतःजवळ देवटाकळीला ठेवून घेतली घरात अपंग आई व पाठीशी कुठलेही पाठबळ नसताना या 26 वर्षे तरुणाने त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या मुलीशी लग्न केले तिचा वतीच्या आई-वडिलांचा अत्याचार सहन करत राहिला परंतु त्याची घोर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने शेवगाव पोलिसांमध्ये धाव घेतली परंतु शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली या तरुणाची अवस्था “तेल गेलं { बायको गेली } तूप गेलं { पैसा गेला } हाती धुपाटण आलं अशी झाली.
*ताजा कलम*
*शेवगावच्या एका खाजगी दवाखान्यामध्ये नर्स म्हणून प्रॅक्टिस करत असताना या देवटाकळीच्या तरुणाची या तरुणी बरोबर ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्या मुलीने याला गंडवायचे हिशोबाने याच्याशी लग्नाचा घाट घालून 20 ते 22 लाख रुपयांना चुना लावला त्याच्यापासून पहिलं लग्न झालेलं त्यापासून मुलगी झालेली सर्व माहिती दडवून ठेवले त्यास तिच्या आई-वडिलांनी साथ दिली लाखो रुपयांना फसवणूक झालेला हातरून आत्महत्या करण्याचे विचारात आहे याला न्याय कोण देणार ???*
*क्रमशः*
*तालुक्यात लग्नासाठी मुली कमी असल्याने शेवगाव तालुक्यातील काही टोळ्यांणी गैरफायदा घेऊन गरजू लग्नाळू मुलांना लाखो रुपयांचा गंडा घालून एक बकरा कापून झालं की दुसरा शोधायचा हा धंदाच काहींनी मांडला आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*