जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
राळेगाव:-राळेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले असून राळेगाव तालुक्यातील किन्ही गावाजवळील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसात पूल वाहून गेला . परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या पाच ते सात गावांचा संपर्क तुटला आहे.
किन्ही मार्गावरील गावालगतचा पूल दिनांक 14 जुन च्या सायंकाळी 5:50 आलेल्या पावसामुळे वाहून गेला आहे हा पूल इतका कमजोर आहे. अंदाजे तो पूल 45 वर्ष जुना काम आहे तो दरवर्षी थोडा थोडा पूल वाहून जात होता ह्या वर्षी तो पूल पूर्ण वाहून गेला पुराचे पाणी वाढल्याने ही अवस्था झाली. या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी अनेकदा किन्ही (जवादे) , येथील विद्यार्थी आणि नागरिकांनी केली होती. परंतु, यांची दखल लोकप्रतिनिधी व प्रशासनाने न घेतल्याने हा पूल वाहून गेल्याची चर्चा किन्ही जवादे येथील नागरिक करित आहे.