शेवगाव तालुक्यातील आणखी दोन बिगबुल्स फरार सालवडगाव चा गणेश भिवसेन औटी आणि रावतळे कुरुडगाव चा शंकर रावसाहेब शिंदे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार
एस. आर. इन्वेस्टर चा संचालक शंकर रावसाहेब शिंदे आणि ओम साई कॉम्प्युटरचा संचालक गणेश भिवसेन औटी कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार गुंतवणूकदार हवालदिल
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील रहिवासी असलेला आंबेडकर चौकामध्ये पुरनाळे कॉम्प्लेक्स मध्ये ओम साई गणेश कॉम्प्युटरचा संचालक गणेश भिवसेन औटी वय 30 तालुक्यातील रावताळे कुरुडगाव येथील रहिवासी असलेला एस. आर. इन्वेष्टर या बोगस ट्रेडिंग कंपनीचा संचालक शंकर रावसाहेब शिंदे वय 35 लोकांचे कोट्यावधी रुपये घेऊन तालुक्यातून परागंदा झाले आहेत गेल्या काही महिन्यापासून “मी शेवगावकर” णे सातत्याने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या व सध्या फरार असलेल्या सुमारे 100 शेअर मार्केटच्या फरार बिग बुल्स आणि त्यांचे चेले चपाटे यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली असून हळूहळू फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये जनजागृती होऊन तक्रार करण्यासाठी धजावत आहेत काहींनी रोख स्वरूपात पैसे दिलेले आहेत काहींनी ऑनलाईन रक्कम टाकलेले आहेत काहींनी ऑनलाईन व्याज घेतलेले आहे एवढे पुरावे गुन्हे दाखल करण्यासाठी माफक आहेत परंतु गुन्हा दाखल केल्यानंतर आणि संबंधित फरार बिग बॉस ला अटक झाल्यानंतर आपले पैसे कोण देणार या भीतीने गुंतवणूकदार तक्रार करण्यास तयार होत नाहीत “असेही त्यांचे पैसे हरणाच्या शिंगाला बांधल्या सारखेच आहेत” हे त्यांच्या लक्षात येत नाही
*ताजा कलम*
*खेड्यापाड्यातील हजारो लोकांनी आपले साठवून ठेवलेले शेती उत्पन्नातील पैसे या भामट्या लोकांच्या हवाली केल्याने आज त्यांच्यावर खत बी बियाणे घेण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नाहीत शेवगाव तालुक्याच्या बाजारपेठेची वाट लावणाऱ्या या नराधमांना कोंढाणा शिकविणार पोटतिडकीने लिखाण करून सुद्धा शेजारच्या तालुक्यातील गुंड लोक लोक आपली ओळख लपून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पत्रकार अविनाश देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी देतात याबाबत पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी एका ऑनलाइन तक्रारी द्वारे श्री पत्रकार अविनाश देशमुख यांनी केली आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*