सिध्दार्थ किसन चव्हाण याचे हार्दिक अभिनंदन
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील विद्यार्थी सिद्धार्थ किसन चव्हाण राहणार विद्यानगर याची भारतीय प्रशासन सेवा मध्ये नुकतीच निवड झाली म्हणतात ना कोशीश करनेवाले की कभी हार नहीं होती डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाची शासनकर्ती जमात व्हायचे आहे, सर्व वंचित बांधवांचे मार्गदर्शक प्रा किसन चव्हाण सर प्रतिकूल परिस्थितीवर मत करून आपला स्वंतत्र इतिहास निर्माण करत गेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पेटलेल्या चव्हाण सरांनी आपल्या आयुष्यामध्ये किती अवहेलना, टोकाची गरिबी, जीवघेणा संघर्ष केला या संपूर्ण कहाणीचे आपल्या आंदकोळ नावाच्या आत्मचरित्रा मध्ये वर्णन केलेले आहे सरांचे अंदकोळ हे पुस्तक सोलापूर मधील अहिल्यादेवी होळकर विद्या पिठामध्ये पदवीच्या अभ्यास क्रमात समाविष्ट करण्यात आलें आहे आभिमामाने सांगायची बाब म्हणजे एक साधा शिक्षक त्यांच्या पुस्तकाची नोंद एक विद्यापीठ घेते ही बाब उल्लेखनीय आहे अशा कर्तबगार बापाच्या मुलाने खूप मोठी कामगिरी केली बापाच्या पुढे पाऊल ठेऊन म्हणता ना की *”बाप से बेटा सवाई”प्रा. किसन चव्हाण सर यांचे चि. सिद्धार्थ किसन चव्हाण याने पहिल्याच प्रयत्नात भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये “वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये”पेटंट अधिकारी”( *क्लास 1 राजपत्रित अधिकारी* ) हे पद मोठ्या कष्टाने संपादित केले आहे. *विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या पदावर राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली आहे सर्वात प्रथम सिद्धार्थ चव्हाण साहेब यांचे हार्दिक अभिनंदन..
*ताजा कलम*
*प्रा.किसन चव्हाण सर यांनी फक्त बाबासाहेब सांगितलेच नाहीत तर ते आचरणात आणले का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या उक्ती प्रमाणे सत्यात उतरवले म्हणजेच सिद्धार्थ चव्हाण शेवगाव सारख्या ग्रामीण भागातून भारतीय प्रशासन सेवा अधिकारी झाला याबद्दल त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांचे श्री किसन चव्हाण यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता