शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत एसटी डेपोचे पास प्रत्येक शाळेमध्ये वितरित होणार या योजनेचा शेवगाव मध्ये शुभारं
अहिल्याबाई होळकर मुलींचे मोफत पास वाटपाचा शुभारंभ रा प शेवगांव आगाराचे पालक अधिकारी व विभागीय भांडार अधिकारी रा प अहमदनगर विभाग येथील श्री संकेत राजहंस साहेब व आगार व्यवस्थापक श्री अमोल कोतकर साहेब यांचे हस्ते करण्यात आला
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक १८/०६/२०२४ रोजी श्रीराम विद्यालय ढोर जळगांव येथे अहिल्याबाई होळकर मुलींचे मोफत पास वाटपाचा शुभारंभ रा. प. शेवगांव आगाराचे पालक अधिकारी व विभागीय भांडार अधिकारी रा. प. अहमदनगर विभाग येथील श्री संकेत राजहंस व आगार व्यवस्थापक श्री अमोल कोतकर यांचे हस्ते करण्यात आला .या प्रसंगी आगार व्यवस्थापक श्री कोतकर साहेब यांनी एस टी महामंडळामार्फत 5 वी ते 12 वी मुलींना मोफत अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास योजना तसेच विद्यार्थ्यांसाठी 67% प्रवास सवलत योजनेबद्दल आगार व्यवस्थापक यांनी विस्तृत पने माहिती दिली.
तसेच प्रवास करताना विद्यार्थ्यांनी सुरक्षित प्रवासासाठी कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्रीराम विद्यालय ढोर जळगांव येथील प्राचार्य श्री चेमटे सर यांनी सर्वांचा सत्कार करून शेवगाव आगाराच्या “पास आपल्या शाळेत” योजनेचे कौतुक करून शेवगाव आगाराच्या वतीने सर्व प्रथम श्रीराम विद्यालयाची निवड पास वाटप करण्यासाठी झाले बाबत आभार व्यक्त केले. तसेच रा.प. च्या सदर योजनेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी श्री.चेमटे सर यांनी विद्यार्थांच्या जडण घडणीत जसा शाळेचा वाटा असतो त्यापेक्षा जास्त वाटा एसटी बसेसचा असतो असे प्रतिपादन करत लालपरी बद्दल आपुलकी व्यक्त केली.या प्रसंगी आगाराच्या वतीने वाहतूक नियंत्रक राहुल शेळके व सचिन राजहंस यांनी विद्यार्थी पास वाटप केले.
*ताजा कलम*
*या निमित्ताने शेवगाव आगारांनी डेपोसाठी 20 नवीन गाड्यांची गरज आहे लांब पल्ल्याच्या फेऱ्या जवळजवळ सर्वच बंद आहेत नवीन प्रवासी संघटनेची आवश्यकता आहे बस स्थानकाचे रेंगाळलेले काम वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे या सर्व समस्यांवर अहमदनगर परिवहन विभाग चे सर्व अधिकारी निश्चित धडाडीचे निर्णय घेतील अशी अपेक्षा शेवगाव करना आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*