जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील ३७ मच्छीमार सहकारी संस्थांना आमदार बंटी भांगडिया यांनी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करीत चिमूर तालुक्यातील १४ संस्था पैकी १० संस्थांना मदत सुपूर्द करण्यात आली. चिमूर येथील वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्थेला ५० हजार रूपयांचे धनादेश भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांनी संस्थेचे अध्यक्ष शंकर मोहीनकर व संचालक मंडळा कडे सुपूर्द केला. ढिवर समाज व मच्छीमार संस्थाच्या विकासासाठी आमदार बंटी भांगडिया सदैव पाठीशी आहे. मच्छीमार यांचे साठी जॅकेट, जाळे खरेदी किंवा इतर कार्यासाठी ही मदत आहे. समाजानी येणाऱ्या काळात आमदार बंटी भांगडिया सोबत राहण्याचे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांनी केले.
मंचा वर युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, शंकर मोहीनकर, भुपेश पचारे,रमेश कंचर्लावार, विलास कोराम,विकी कोरेकर, करण चावरे, गुणवंत चटपकर व संस्थेचे संचालक आणि ढिवर समाज बांधव यावेळी उपस्थित होते.