Breaking News

दादापुर तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संदीप चौधरी निर्विवाद निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा :- तालुक्यातील दादापुर येथे दिनांक 30 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत दादापुरच्या वतीने आयोजित आमसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप मधुकरराव चौधरी यांची एकतर्फी बहुमताने निवड झाली. त्यांनी केलेले सामाजिक कार्य व गावाविषयी असलेली तळमळ बघून पुन्हा एकदा त्यांची निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी अभिनंदन केले आहे.

या निवडीवेळी शिवसेना उपविभाग प्रमुख दिलीप बोधाने, शिवसैनिक मंगेश खाडे आणि अन्य ग्रामवासी उपस्थित होते. दादापुर ग्रामस्थांनी या आमसभेत भाग घेऊन अनेक जनहितार्थ प्रश्न मार्गी लावले. चौधरी यांच्या निवडीमुळे दादापुर ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved