सात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा समावेश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभाचे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात आज दिनांक २५ सप्टेंबर बुधवारला दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास हुतात्मा स्मारक चिमूर ईथुन या मोर्चाची सुरुवात होऊन प्रशासकीय भवन चिमूर याठिकाणी हा मोर्चा गेल्यानंतर राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढून व मानधन वाढ पेंशन रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात बचतगटाची आहार पुरवठा व समृध्दी आहाराची रक्कम वाढविण्यात यावी व इतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देऊन हा मोर्चा प्रशासकीय भवन ईथुन पुढे अंगणवाडी ताईचा मोर्चा थेट चिमूर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकला आणि मोर्चाची रूपरेषा सभेमध्ये बदलून एकात्मिक बालविकास अधिकारी पूनम गेडाम यांना महामार्गवरच निवेदन देण्यात आले.
गेली ४८ वर्षे कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी ताई महागाईने भरडल्या आहेत त्यांच्याकडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत त्यामुळे निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्च्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी ताईंनी व बचत गट प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून संख्याबळ वाढविण्याचे कार्य केले.यावेळी माधुरी रमेश विर चिमुर,प्रभा विश्वनाथ चामटकर नागभीड,लता राजु देवगडे भद्रावती,ललीता सोनुले मुल,विद्या वारजुकर ब्रम्हपुरी,संयोगिता गेडाम सिंदेवाही,अन्नपुर्णा हिरादेवे वरोरा, रोशनी चंदेल अध्यक्ष चिमुर तालुका बचत गट आहार पुरवठा संघटना यांनी या मोर्चाची धुरा सांभाळली.या मोर्चाला चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतीश वारजूकर व माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले.