बहुजन समाज पार्टी, तालुका लाखांदूर तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा) – शासानाद्वारे गोर गरीब जनतेस घरकूल मंजूर करण्यात आले असून रेती अभावी कित्येक घरकूल लाभार्थ्यांचे घर बांधकाम थांबून आहेत.त्यामुळे लाभार्थ्यांना सोईचे होईल अशा जवळच्या घाटावरून मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी बहुजन समाज पार्टी लाखांदूर यांनी तहसिलदार वैभव पवार यांच्या मर्फत जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आलेल्या निवेनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आपले हक्काचे घर बांधण्याची संधी मिळत आहे, परंतु बांधकामाच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. विशेषत: रेतीच्या किमतीमुळे घरकुलाचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या नाजदिकच्या नदी पात्रातून रेती मोफत उपलब्ध करून देण्यात यावी. घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकाम करतांना रेती उपलब्ध होत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे घर बांधकाम थांबून आहेत, त्यामुळे घरकुल बांधकामास आवश्यक असलेली रेती विनामूल्य व सोईस्कर होईल या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात यावी. जेणेकरून लाभार्थ्यांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत होईल, यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल व सरकारच्या वतीने दिलेल्या योजनांचा अधिकाधिक फायदा घेतला जाईल. यावेळी ब. स. पा. नेता रोशन फुले साकोली विधानसभा प्रभारी बहुजन समाज पार्टी ,चेतन नेपाल बोरकर
तालुका प्रमूख बहुजन समाज पार्टी लाखांदूर, सौरभ नंदेश्वर बी.व्हीं.एफ, प्रणय मेश्राम, कैलास रंगारी, मुकुंदा ढोक, निलेश नंदेश्वर आदी उपस्थीत होते.
प्रतिक्रिया
लाखांदूर तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध व्हावी या साठी खोलमरा, मोहरना, नांदेळ, अंतरगाव, या चार रेती डेपो वरुन लाभार्थ्याला रेती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी तहसिल कार्यालयामध्ये ऑनलाईन बुकींग करून देण्यात येत आहे. त्यासाठी घरकूल लाभार्थ्यांनी २०२३-२४ चा मंजूर घरकूल, घरकूल मंजूर क्रमांक, ग्राम पंचायत प्रमाणपत्र, घरकूल मंजूर यादी, आधार कार्ड, मोबाईल नंबर, व स्वतः लाभार्थी हजर असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे G P S असलेला ट्रॅक्टर आवश्यक आहे अशी माहिती लाखांदूरचे तहसिलदार वैभव पवार यांनी दिली आहे.