खानगाव येथील वामन बावणे यांच्या बैलास साप चावून झाला मृत्यू
आमदार बंटी भांगडिया यांनी केली शेतकऱ्यास आर्थिक मदत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- शेतीच्या कामासाठी फार उपयोगी असणारा शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे बैल. खानगाव येथील शेतकरी वामन बावणे यांच्या बैलास साप चावून मृत्यू झाल्याने आमदार बंटी भांगडिया यांनी सहकार्य म्हणून आर्थिक मदत केली.वामन बावणे यांनी आपल्या शेतात दुपारी पाळीत बैलांना पाणी पाजले व तनिस टाकून खुटाला बांधले होते. विषारी सापाने बैलाच्या तोंडास चावा घेतल्यामुळे बैलाचा मृत्यू झाला. रब्बी पीक हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुःखा चा डोंगर कोसळला. ही घटना दिनांक ७ डिसेंबर ला घडली.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी म्हणून आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आर्थिक मदत केली. आर्थिक मदत वामन बावणे यांना सुपूर्द केली असता भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, युवा मोर्चा तालुका महामंत्री रोशन बनसोड व आदी उपस्थित होते.