६६ लोकांनी नेत्रदानाचे संकल्प घेऊन नेत्रदानात दिले अमूल्य योगदान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – महावितरण कार्यालय वरोरा तसेच रोषनी फाउंडेशन व माधव नेत्रालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरण कार्यालय वरोरा येथे निशुल्क नेत्र तपासणी शिबिर तसेच नेत्रदान जागरूकता शिबिर व मोतीबिंदू निदान व निशुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक. ०४ फरवरी २०२५ रोजी महावितरण वरोरा विभाग येथे करण्यात आले. यामध्ये महावितरण मधील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच महावितरणच्या परिसरातील व्यक्तींनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला यामध्ये एकूण – १३० लोकांच्या नेत्र तपासण्या निशुल्क करण्यात आल्या व मरणोत्तर नेत्रदानाबाबत रोशनी फाउंडेशन च्या वतीने गैरसमज नष्ट केल्याने तसेच नेत्रदान विषयी जागरूक केल्याने एकूण ६६ लोकांनी नेत्रदानाचे संकल्प घेऊन नेत्रदानात आपले योगदान दिले.
यावेळी माधव नेत्रालयातर्फे डॉक्टर यांनी मोलाचे योगदान देऊन सर्व नेत्र तपासण्या केल्या. व रोशनी फाउंडेशन तर्फे राजेंद्र जैन, भागीरथ साहू, सुभाष नाफड़े, दशरथ कळंबे, मधुकर वनकर, श्रीधर दफ्तरी, अनिल माटे, अनुपम शुक्ला , यादव लक्षणे, सुरेश अगडे यांनी नेत्रदान व जनजागृती केल्याने १३० पैकी ६६ लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प घेतला. तसेच महावितरण वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता विलास नवघरे साहेब यांच्या पुढाकाराने व संजय जळगावकर, राहुल पावडे, सचिन बदखल, भालचंद्र घोडमारे, देवेंद्र धनंजोडे, अविनाश देवतळे, विवेक माटे, यांच्या सहकार्याने व स्वेच्छेने नेत्रदानाचा संकल्प घेणारे व्यक्ती विलास दामोदर नवघरे, निलेश गुरनुले, विपिन
कोचे, सचिन बनकर, किशोर तुराणकर, प्रफुल लालसरे, वैभव जुमडे, पल्लवी भौमिक, सत्यराज वावरे, अमोद रंदये, सेमोन साहू, अविनाश देवतळे, रुपेश निरंजने,दत्ता चौधरी, पूनम चौधरी, श्वेता मोरे, पंकज चव्हाण, प्रफुल सारडा, भूषण गायकवाड,जनार्दन जुमणाके, ज्योत्स्ना जाधव, वर्षा आसुटकर, वर्षा सोमलकर, सोनू हनुमंते, नामदेव कोरेटी, अनिल भट, प्रशांत ढोके, भूषण म्हैसकर,मनीषा कोल्हे, श्रीमती रेखा पेठकर,मंजुताई मोरे, विद्याताई मानके,संगीता मडावी, उर्मिला आतकर,माया कडवे,प्रमिला भानारकर,सारिका ढोके, नम्रता गायकवाड,नंदा गायकवाड,नैना चव्हाण ,श्रद्धा सारडा,देवकाबाई सारडा, अंतरा भौमीक, मृणाल भौमीक,अभिजीत भौमिक,दिवाकर मडिवार, दिनेश सेलवटकर, आनंद निखारे, नत्थुजी मानकर,आदित्य दाते, सुरेश तुरणकर, सौ सुनंदा तुरणकर,सौ.वैशाली विलास नवघरे,प्रसाद कडवे,सौ.पल्लवी जुमडे,कुमार सोमेश जुमडे, निलेश जाधव, रवी जाधव, राजेंद्र भरडे, सुशांत निमगडे, सारिका नीमगडे, जितेंद्र काळे, लक्ष्मण सेलवटकर, विवेक माटे, सौ रंजना माटे,इत्यादी लोकांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प घेतला आहे. तर सदर कार्यक्रमास शकील शेख, भूषण म्हैसकर, अजिंक्य वाभीटकर, धनराज मेश्राम,पिंटू शेंडे,यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर शिबिर यशस्वी करण्याकरीता विलास नवघरे यांचे संपूर्ण वरोरा विभागातर्फे आभार मानण्यात आले. तसेच रोशनी फाउंडेशन नागपूर आणि माधव नेत्रालय नागपूर यांचे सुद्धा यावेळी आभार मानण्यात आले.