अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर ग्राम महसूल अधिकारी यांनी केली तात्काळ कारवाई
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अवैधरित्या रेती तस्करी करणारे झाले सक्रिय
रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर चिमूर तहसीलला केला जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असून बघावे तिकडे महसूल अधिकारी यांचेवर हल्ले होतांना दिसून येत आहे. म्हणून रेती तस्करी करणारे यांची दादागिरी वाढतच जात असल्याने यावर आढा घालने गरजेचे आहे.अशातच ग्राम महसूल अधिकारी यांनी धाडसत्र सुरु केले व दिनांक. ०५/०२/२०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास पळसगाव मार्गाने विना नंबरचा अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना सापळा रचून ट्रॅक्टर पकडला.
या ट्रॅक्टर चा मालक अमित जांभुळे असल्याचे सांगण्यात आले असून चालक मंगलदास बन्सोड यांचेवर कारवाई करण्यात आली आहे. हि कारवाई ग्राम महसूल अधिकारी शुभम बदकी, केतनसिंग घरकेले, स्वप्नील उमरे यांनी केली.सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय चिमूर येथे पकडून जप्त करण्यात आले आहे.व चिमूर शहरातील मुख्य मार्गाने रात्रीला बिनधास्त पणे रेतीची वाहतूक केली जाते याकडे महसूल अधिकारी यांचे लक्ष का नाही? अशी चर्चा नागरिक दबक्या आवाजात ठिकठिकाणी करीत आहे.