जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिनांक 2 फेब्रुवारी २०२५ श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली. गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी ला हरी भक्त पारायण स्नेहल संतोष पित्रे यांच्या गोपाळ काल्याच्या कीर्तनाने नवरात्री महोत्सवाची सांगता झाली. घोडा यात्रा महोत्सव महाशिवरात्री पर्यंत सुरू राहणार आहे.चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडा यात्रा नवरात्री महोत्सवाला दिनांक २ फेब्रुवारी ला सुरुवात झाली.दिनांक ४ फेब्रुवारी रोजी भाके महाराज यांच्या हस्ते रथाची विधिवत पूजा करण्यात आली. दिनांक ६ फेब्रुवारी ला गरुड राज वाहन यांची परिक्रमा पूर्ण झाली.
दिनांक ८ फेब्रुवारी ला रात्री ११ वाजता मारोती वाहन परिक्रमा पूर्ण करून बालाजी महाराज यांना परिक्रमेसाठी निघण्याचा संदेश देण्यात आला. मिती माघ शुद्ध त्रियोदसी दिनांक १० फेब्रुवारीला श्रीहरी बालाजी महाराज अश्वृढ घोडा रथावर स्वार चार शिपाई सहित नगर परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमे दरम्यान श्रीहरी बालाजी महाराज यांनी लाखो भाविकांना दर्शन दिले.दिनांक १३ फेब्रुवारी रोज गुरुवार ला दुपारी १२ वाजता हरी भक्त पारायण सौ स्नेहलताई संतोष पित्रे यांच्या नारदीय गोपाल काल्याच्या कीर्तनाला सुरुवात झाली. श्रीहरी बालाजी महाराज यांची आरती करून दुपारी ३ वाजता शुभम भोपे यांचे हस्ते दही हंडी फोडून काल्याच्या समारोप झाला. गोपाल काल्याच्या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी गर्दी केली होती. श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा महोत्सव महाशिवरात्री पर्यंत सुरू राहणार असून सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले.