विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- आज दि 13 फेब्रुवारी 2025 ला शिवबा राजे फॉउंडेशन मार्फत साजरा करण्यात असलेल्या साप्ताहिक शिवजयंती महोत्सवाचे मोठ्या थाटामाटात उदघाटन पार पडले.साप्ताहिक सोहळ्याची सुरवात चिमुकल्याच्या माध्यमातून किल्ले बनवा स्पर्धा पासून सुरवात करण्यात आली विविध शाळा व विद्यालयीन विध्यार्थ्यांनी जवळपास 60 शाळकरी विध्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. किल्ले बनवा स्पर्धेत सुहानी लोहबरे प्रथम क्रमांक, चैतन्य नगरारे द्वितीय क्रमांक, प्रिया धनजोडे व चमू तृतीय क्रमांक पटकविला.
यावेळी प्रदिप परांजपे GM Project NTPC, MOUDA,देवेंद्र गोडबोले माजी जिल्हा परिषद सदस्य,भावरावजी ठाकरे नोंदणी उपमहानिरीक्षक नागपूर विभाग,आनंद सिंग सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,नितेशजी वांगे ,कृष्णकुमार तिवारी पोलीस उपनिरीक्षक,मौदा पत्रकार संघांचे – दयालनाथ नानवटकर व दिनेश पत्रे यांचे हस्ते उदघाटन सोहळा पार पडला. उदघाटन सोहळा प्रसंगी धर्मरक्षक ढोल ताशा ध्वज पथक मौदा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून सोहळा सपन्न झाला.