जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-सतत पावसामुळे वरोरा तालुक्यातील कोसरसार गावालागत नदीला पुर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून तसेच बोडखा, कोसरसार, कव्हडापुर, महालगाव, सुसा या गावातील पाण्याखाली जमीनी आल्याने पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी सरकार ने अतिवृष्टी महापूर जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वामनराव चंदनखेडे व गणेश चिडे यांनी केली आहे, त्यावेळी सिद्धार्थ सोयाम, रोशन पेंदोर, पवन बलखंडे, समीर तुराळे, आदित्य घेनघारे,गावातील नागरिक व युवक उपस्थित होते.