
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-हनुमान मंदिर २० लक्ष रु चे सभागृह बांधकाम करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पुढच्या वर्षी च्या काल्यापुर्वी च सभागृह बांधकाम करून देण्याचे विश्वास देत मागील ६ महिन्यात ४६ कोटी निधी आल्याचे यश आले आल्याचे सांगत प्रत्येक गावात जल जीवन योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ पुरवठा द्वारे पाणी देण्याचे विश्वास देत गुरुकुंज मोझरी संस्थेचे संचालक पद मिळणे यात मी भाग्यशाली समजून पुढे बोलत आमदार बंटीभाऊ भांगडिया म्हणाले की पुढील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी पूर्वी गाव नशा मुक्त करण्याचे आवाहन केले.
२४ तास वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत असून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम करून शेतकरी बांधवांना २४ तास वीज पुरवठा करून देण्यासाठी प्रयत्न करून देण्याचा विश्वास आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी व्यक्त करीत असेच सातत्याने सतत सहकार्य देण्याचे सांगितले.
कोटगाव (हेटी) येथील हनुमान जयंती ,दत्त जयंती व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव प्रसंगी कार्यक्रमात भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, सरपंच प्रफुल कोलते, रमेश कंचर्लावार, भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई ननावरे ,आशा मेश्राम, कापसे महाराज, ठाणेदार राऊत व आयोजक मंडळी उपस्थित होती. संचालन चरणदास वाघ यांनी केले. गावकरी उपस्थित होते.