
बफर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
मुरुमाच्या वाहतुकीसाठी नवेगाव सफारी गेट साठी येणाऱ्या पर्यटकांच्या रोडचा वापर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात खडसंगी बफर वन परिक्षेत्रात मुरुम तस्करीला उधाण आले असून गेल्या वर्षांपासून बफर वन परिक्षेत्रात मुरुमाचे मोठे मोठे खड्डे पडले आहे.ताडोबातील बफर क्षेत्र नवेगाव प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झरना रिसोर्टच्या बाजुला अगदी 5 मिटर असलेल्या तलावामध्ये हायवा ट्रक व दोन पोकलँड मशीनीद्वारे दिवस – रांत्रो मोठ्या प्रमाणावर मुरूमाचे उत्खनन सुरू आहे.त्यामुळे मोठ – मोठे खड्डे पडले असून त्याच ठिकाणी वन्य प्राण्याचे वास्तव नेहमीच असते गेल्या सोमवारी मुरुमाचे खड्डे असलेल्या ठिकाणांच्या रोडवर छोटा मटका बसुन असताना टिपलेले छायाचित्र सोशल मीडियावर वायरल झाले आहे.
झरना रिसोर्ट च्या बाजूला मुरुमाचे होत असलेल्या मोठ – मोठ्या खड्यांमुळे भविष्यात वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात येऊ शकतो .मुरुमाचे मोठ – मोठे खड्डे वन्यप्राण्यासाठी जीव घेणे ठरू शकतो.
बफर वन क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कसे ? नवेगाव गेट मध्ये सफारी साठी येणारे पर्यटकाचा रोडवर मुरुमाचे मोठ्या हायवा चालतात या कडे कोणत्याही अधिकार्याचे लक्ष का गेले नाही ? वनपरिक्षेत्रातील मुरुम उपसा करनाऱ्याचे अनेक किस्से बाहेर यायला लागले आहे.
या बाबत अनेकदा पोर्टल वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित केल्यानंतर ही जंगलात अवैध मुरुमाचा उपसा करणारे अधिकारी स्वार्थापोटी, राजकीय, लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी दंडात्मक कारवाई करण्यास दिरंगाई करण्यात येते असे बरेच प्रकरण तालुक्यात पहावयास मिळते आहे. परवानगी देणारे अधिकाऱ्यांवर व kcc कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे.