Breaking News

महाराष्ट्रातील कांग्रेस चे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर- आर्णीचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासदार धानोरकर त्यांचे अकाली मृत्युमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. नवी दिल्ली येथे मेंदाता हॉस्पीटल येथे उपचार घेतांना त्यांनी आज पहाटे ३ वाजता अखेरचा श्वास घेतल्यांचे सुत्रानी सांगीतले.

काही वर्षापूर्वी खासदार धानोरकर यांनी वेट लॉस्टची सर्जरी केली होती. या सर्जरीच्या जागेवर इंफेक्शन झाल्यांने त्यांचेवर काही दिवसापासून नागपूरात उपचार सुरू होते. किडणी स्टोनचे उपचार झाल्यानंतर, त्यांचे पोटात दुखणे वाढल्यांने एअर अॅम्बुलन्सने त्यांना मेंदाता हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचेवर उपचार चालू असतांनाच आज पहाटे त्यांची प्रकृती खालावल्याने वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची आज बातमी आहे.

वरोरा भद्रावती मतदार संघातून शिवसेनेचे आमदार असलेल्या बाळू धानोरकर यांनी 2019 च्या निवडणूकीत कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवीत विजय मिळविला होता. राज्यात ते कॉंग्रेसचे एकमेव खासदार होते. खासदार म्हणून निवडूण आल्यानंतर, त्यांनी आपल्या पत्नीलाही आमदार म्हणून निवडूण आणण्यात मोठी भुमिका बजावली होती.

मागील काही दिवसापासून त्यांचे राजकीय वर्तुळात सतत त्यांचे तणाव वाढविणार्या घटना घडल्या होत्या. त्यांचे मेव्हण्यावर इडी चौकशी, संतोष रावत गोळीबार प्रकरणात त्यांचे निकटवर्तीयांना झालेली अटक, त्यांचे वडिलांचे निधन यामुळे ते तणावातही असल्यांची माहीती आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

म.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत रखडलेला पांदण रोड खडीकरण पूर्ण केव्हा होणार

गटविकास अधिकारी यांना माजी सरपंच धनराज डवले यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गेल्या …

टक्केवारी कमी मिळाल्याने विद्यार्थ्यानी घेतला गळफास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.२१/०५/२०२४ ला आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे राहणार नेरी चिमूर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved